Indian Revised Version — Marathi (2019)
स्तोत्रसंहिता 122
1दाविदाचे स्तोत्र आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. 2हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत. 3हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. 4इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात. 5कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत. 6यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल. 7तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो. 8माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो. 9परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.
This chapter is not in this version.
Keep going
Indian Revised Version — Marathi (2019). Indian Revised Version (Marathi), Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, via eBible.org. Inline cross-reference notes removed..